
रत्नागिरीत दुसर्या दिवशीही प्लास्टिक विकणार्यांवर नगर परिषदेची कारवाई
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आरोग्य विभागाच्या पथकाने दुसर्या दिवशीही प्लास्टिक पिशव्या ठेवणार्या दुकानदारांवर आणि फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली. शुक्रवारी 18 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. गुरूवारी 15 हजार 700 रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली
होती. रत्नागिरी शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर गुरुवारपासून कारवाईला सुरूवात झाली. आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बाजारपेठेत कारवाई सुरू केली. शुक्रवारी आठवडा बाजार, रामनाका, पर्याची आळी येथील वेगवेगळ्या दुकानांसह फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई केली. गुरूवारी शहरातील परटवणे, गाडीतळ, गोखलेनाका परिसरातील दुकानांमध्ये आणि फेरीवाल्यांकडे पिशव्या मिळून आल्यानंतर कारवाई करण्यात आली होती.