रत्नागिरीचे समुद्रात नाटे ते गावखडी समोर 18 वावात मोठ्या प्रमाणात तरंगताहेत तेलयुक्त डांबराच्या गुठळ्या
अपघात ग्रस्त ‘पार्थ’ तेलवाहू जहाज मधून मोठ्या प्रमाणात तेलाची गळती सुरू झाली असून साखरीनाटे – आंबोलगड – वेत्ये – किनाऱ्या समोर 18 वाव खोल समुद्रात मागील दोन दिवसापासून ठिकठिकाणी तेलयुक्त डांबराच्या गुठळ्या तरंगताना दिसून येत आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. या तेल युक्त डांबराच्या गुठळ्या गावखडी पर्यंत दिसून येत आहेत.
रत्नागिरी समुद्र किनाऱ्याजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या तेल युक्त डांबराच्या गुठळ्या बाबतची माहिती मच्छीमारांनी मत्स्य खात्यास दिलेली असताना, जिल्हा प्रशासनाकडून त्याची दखल घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या स्वरूपाची उपायोजना केली जात असल्याचे दिसून येत नाही. याचा मोठा फटका येथील आधीपासून मेटाकुटीस आलेल्या गोरगरीब मच्छीमारांना बसणार आहे.
www.konkantoday.com