कापडगाव येथून पोकलँडचा लोखंडी ब्रेकर लांबवला
रत्नागिरी : तालुक्यातील कापडगाव येथून पोकलँडचा लोखंडी ब्रेकर अज्ञाताने लांबवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वा. ते मंगळवारी सकाळी 9.30 वा. कालावधीत घडली आहे. याबाबत विनायक विलास कदम (वय 41, रा. कराड, सातारा) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथील रस्त्याच्या बाजूला उघड्या जागी पोकलँड लोखंडी ब्रेकर ठेवलेला होता. तो अज्ञाताने चोरून नेला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार कांबळे करत आहेत.