
महापुराचा फटका ,चिपळूण आगारातील ३७० ई-तिकिट मशिनमध्ये बिघाड
२२ जुलैच्या महापुरात चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक पूर्णतः पाण्यात बुडाले होते. यामध्ये तब्बल ३७० ई-तिकिट मशिन्स बिघडल्या आहेत. महापूर ओसरल्यानंतर एस.टी. सेवा सुरू झाली. त्यामुळे बिघडलेल्या मशिनला उपाय म्हणून पुन्हा ट्रे तिकिटाचा पर्याय व्यवस्थापनाने शोधला आहे.
महापुरात चिपळूण आगाराचे सुमारे सव्वातीन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आगार व्यवस्थापनाने वर्तविला आहे
.www.konkantoday.com