
रत्नागिरी पर्यटन परिषदेच्या निमित्ताने.
वेदांत फॉक्स कॉन रोजगार निर्माण करणार म्हणून त्याला सवलती दिल्या पाहिजेत मग कोकणातल्या पर्यटन उद्योगांना सवलती का नकोत…….
आजपर्यंत कोकणातील पर्यटन व्यवसायिकांना तरुणांना कोणती मदत शासनाने केली, आणि प्रशासनाने आजपर्यंत किती अडचणी निर्माण केल्या.
27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरी येथे पर्यटनातील सर्व कार्यकर्ते आणि व्यावसायिक आपण दिवसभर एकत्र येतोय. एकमेकांना मदत करून संघटित होऊन आपलं पर्यटन , आपले उद्योग आणि आपलं कोकण पुढे कसं नेता येईल यावर दिवसभराचे मंथन होईल.
वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रातून का गेली यावर एका बाजूने चर्चा चालू आहे. अशा मोठ्या कंपन्यांना वीज दरामध्ये सवलती दिल्या पाहिजेत, सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या पाहिजेत मोफत जमीन दिली पाहिजे यावर सर्वांचे आणि सर्व पक्षांचे एकमत आहे कारण यातून महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगार निर्माण होतील. खरंय महाराष्ट्र समृद्ध होण्याच्या दृष्टीने चीन मधून बाहेर पडणारे मोठे मोठे प्रकल्प भारतात यायला हवेत महाराष्ट्रात यायला हवेत. आणि त्यामुळे अशा प्रकल्पांना सर्व सोयी सवलती दिल्या पाहिजेत.
पण अशा सुविधा कोकणातील पर्यटन उद्योगाला आणि मत्स्य उद्योगाला का दिल्या जात नाहीत
वेदांत सारख्या कंपन्या जितका रोजगार देतील त्याच्या पाचपट रोजगार कोकणातील पर्यटन उद्योग देईल. आणि आता प्रत्यक्ष देतोय. यापेक्षा अधिक रोजगार
कोकणातील मच्छीमार आणि मत्स्य उद्योग देईल.
वर्षानुवर्ष कोणत्याही सवलती सुविधा न मागणाऱ्या स्वाभिमानी कोकणी माणसाला आणि कोकणाला समृद्ध करणाऱ्या कोकणच्या स्वतःच्या उद्योगांना कधी सवलती दिल्या गेल्या असे ऐकिवात नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कोकणातला पर्यटन व्यवसायिक समस्या व्यवसायिक अंबा बागायतदार काम करतोय.
उलट आज लाख दीड लाख स्थानिक तरुणांना रोजगार देणाऱ्या कोकणातील पर्यटन व्यवसाय करणा रिया उद्योजकांना आणि स्थानिक तरुणांना कमर्शियल दराने अव्वाच्या सव्वा विज बिल द्यावी लागतात. शंभर दिवसाचा व्यवसाय आहे, धड रस्ते नाहीत कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत तरी आमचा कोकणातील तरुण स्वाभिमानाने स्वतःच्या हिमतीने पर्यटन उद्योगात उभा आहे.
या उद्योगाला सवलती का नकोत, संपूर्ण कोकणाला रोजगार देण्याची क्षमता असलेल्या पर्यटन उद्योगाला जर शासनाने पाठबळ दिले तर कायापालट होऊ शकेल.
एका बाजूने अशा विषयांसाठी आग्रही राहताना, कोकणातील आमच्या पर्यटन संस्था, आणि या सगळ्या संस्थांना एकत्र घेऊन जाणारा कोकण पर्यटन संघ आम्ही पुढच्या काळात शासनाला कोकणात पर्यटनासाठी सुविधा देण्यासाठी भाग पडेल अशा स्वरूपाची चळवळ चालवणार आहोत.
राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत, आमचे मित्र आमदार प्रसादजी लाड, आमदार शेखरजी निकम, बाळासाहेब माने , रमेशजी कीर राज्य शासनातील सरकारमधील आणि विरोधी पक्षातील
सन्माननीय नेतेमंडळी सुद्धा या परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या माध्यमातून आमचे म्हणणे आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार. आहोत.
डॉक्टर सारंग कुलकर्णी यांनी स्कुबा डायविंग आणि snorckling म्हणजे काय हे मालवण मध्ये दाखवले. याचे काही स्थानिक तरुणांना प्रशिक्षण दिले. आज मालवण तालुक्यातील शेकडो तरुण स्कुबा डायव्हिंगचा व्यवसाय करतात आणि यातून शेकडो कोटीची अर्थव्यवस्था निर्माण झाली. अशा स्वरूपाची क्रांती कुंडलिका नदी परिसरात महेश सानप, वीरेंद्र सावंत या स्थानिक तरुणांनी केले. एकही पर्यटक न येणाऱ्या या नदी परिसरात आता दरवर्षी सात ते आठ लाख पर्यटक येतात आणि शंभर कोटीहून अधिक मोठी अर्थव्यवस्था दहा-बारा गावांमध्ये विकसित झाली हजार भर तरुणांना त्याच परिसरात नोकऱ्या मिळाल्या मुंबईला स्थलांतरित व्हावे लागले नाही. सरकारच्या फारशा मदतीशिवाय अशा स्वरूपाची क्रांती कोकणातल्या तरुणांनी कोकणात केली आहे. यांना थोडे शासनाचे पाठबळ मिळाले सहजपणे परवानगी मिळाल्या आणि शासकीय अधिकाऱ्यांनी मदत कुठलीच नाही केली तरी चालेल पण त्रास दिला नाही
तर इको टुरिझम मध्ये कोकणात खूप मोठी क्रांती होईल.
इंडोनेशियामध्ये पर्यटनाचा मुख्य आधार आकाशातलं पर्यटन म्हणजे एरोस्पोर्ट आहे. छोट्या छोट्या विमानातून आकाशातून निसर्ग पाहणे, समुद्रकिनारी पाहणे आणि सह्याद्रीची जंगलं अनुभवणे हे सर्व शक्य आहे. ऑलिंपिक आणि एशियाड मध्ये पंच म्हणून काम करणारे आणि जागतिक दर्जाचे तज्ञ आणि त्यांची टीम सॅमसंन डिसीलवा हे कोकणात अशा स्वरूपाचे पर्यटन करतात. आणि अशा स्वरूपाचे उद्योजक तयार व्हावेत म्हणून प्रशिक्षण देण्याची व्यवस्था सुद्धा करतात. समुद्री पर्यटना बरोबर अशा स्वरूपाचा सह्याद्री पर्यटन विकसित होईल असं आपल्याला भविष्यात पाहायचं आहे.
27 सप्टेंबरला पर्यटन परिषदेच्या निमित्ताने हे सगळे प्रत्यक्ष यशोगाथा कोकणात निर्माण करणारे दिग्गज या परिषदेत दिवसभर सहभागी होत आहेत. इको टुरिझमच्या माध्यमातून निसर्गाची कुठलीही हानी न करता एक मजबूत अर्थव्यवस्था कोकणात निर्माण करता येईल हा विश्वास घेऊन ही टीम भविष्यात कोकणात काम करणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेला गती मिळावी म्हणून राज्य सरकारची मदत मिळावी असा पाठपुरावा कोकण पर्यटन उद्योग संघाची आमची टीम आमची रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्था करणार आहे. या सगळ्या विषयात उत्साहाने काम करणारा आमचा रत्नागिरी जिल्ह्याचा प्रमुख राजू वाटलेकर याचे विशेष कौतुक आणि अभिनंदन, कुणी मदत करो अथवा ना करो चांगलं न्हणो किंवा वाईट म्हणो गेली अनेक वर्ष सातत्याने हे उपक्रम तो रत्नागिरीमध्ये राबवतोय , सुहास कौस्तुभ भाई मकरंद ही सगळी टीम काम करत आहे. किशोर भाई धारिया यांचे सातत्यपूर्ण सहकार्य आहे.
त्याच्या या प्रयत्नांना पाठबळ देण्याकरता आम्ही सगळे कार्यकर्ते 27 तारखेला रत्नागिरीमध्ये जमतोय.
ज्यांना ज्यांना कोकणात पर्यटन विकसित व्हावे असे वाटते आणि जे या उद्योगात प्रत्यक्ष काम करतायेत आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि उपक्रम ज्यांना कोकणात राबवायचे आहेत अशा सर्वांनी या परिषदेला आवर्जून उपस्थित रहा. परिषद विनामूल्य आहे
संपूर्ण कोकणातून स्वखर्चाने परदेश परिषदेसाठी येऊन दिवसभर उपस्थित राहणे हेच परिषदेचे शुल्क आहे. फक्त कार्यकर्त्यांना आणि व्यवसायिकांना विनंती अगोदर आपल्या नावांची नोंदणी करा. कारण हॉलमध्ये मर्यादित जागा आहे.
रत्नागिरीच्या आणि कोकणच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही परिषद एक क्रांतिकारी परिषद ठरेल असा विश्वास आहे.
संजय यादवराव
संस्थापक कोकण पर्यटन उद्योग संघ
राजू भाटलेकर
रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था