
चिपळूणच्या नगराध्यक्षांनी वाढीव बिलात मोठ्या प्रमाणात गैरकारभार केल्याचा पुरावा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा आरोप
चिपळूणच्या नगराध्यक्षांनी ५८ (२) चा वापर करून तब्बल साडेचार कोटी रुपयांची कामे केल्याचे उघड झाले आहे. याशिवाय वाढीव बिलात मोठ्या प्रमाणात गैरकारभार केल्याचा पुरावा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनीजिल्हाधिकार्यांकडे सादर केला आहे.
कोणतीही तातडीची गरज नसताना करोडो रुपयांची कामे मनमानी कारभार करीत करण्यात आली आहेत, त्याची आता चौकशी होणार आहे. विकास आघाडीने नगराध्यक्ष हटाव मागणी पत्र जिल्हाधिकार्यांकडे दाखल केले आहे.
www.konkantoday.com