स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
रत्नागिरी : पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणातील तीनही संशयितांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. बुधवारी न्यायालयाने हा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांना दोनवेळा पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या खून प्रकरणात संशयित म्हणून स्वप्नालीचा पती सुकांत गजानन सावंत (वय 47, रा. सडामिर्या, रत्नागिरी), रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (वय 43, रा. सडामिर्या, मधलावठार, रत्नागिरी) आणि प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (33, मूळ रा. विसापूर कारुळ, गुहागर सध्या रा. मिर्याबंदर, रत्नागिरी) अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या तीनही संशयितांची नावे आहेत.