मुंबईतील प्रसिद्ध सोने – चांदी व्यापारी कीर्ती कोठारी रत्नागिरी बाजारातून गायब झाल्याची नातेवाईकांची तक्रार
मुंबईतील प्रसिद्ध सोने – चांदी व्यापारी कीर्ती कोठारी रत्नागिरी बाजारातून गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.सोमवारी रात्रीपासून गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोठारीने नेहमीप्रमाणे आपल्या व्यावसायिक कामाकरिता रत्नागिरीत आले होते या प्रकारामुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.
मुंबई येथून व्यावसायिक कामासाठी सोने चांदीचे व्यापारी कीर्तिकुमार कोठारी (५५) हे नेहमीप्रमाणे रत्नागिरीत आले होते ते राधाकृष्ण नाका येथून बेपत्ता झाले आहेत. कीर्तिकुमार हे मीरा भाईंदर येथील असून, ते रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात सोने चांदीचा माल विकण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे ते रत्नागिरीत आले होते. आठवडा बाजार येथील एका लॉजमध्ये ते राहिले होते. सोमवारी रात्री ते एमजी रोड येथील एका ज्वेलर्सकडून राधाकृष्ण नाक्यापर्यंत चालत आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर त्यांचा पत्ता लागत नाही. यासाठी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने होते, अशी चर्चा आहे.
सोमवारी रात्रीनंतर नातेवाईकांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांजवळ चौकशी केली. मात्र, कोणतीच माहिती मिळत नसल्याने त्यांनी थेट रत्नागिरी गाठली. कीर्तिकुमार यांचे नातेवाईकही त्यांचा शोध घेत असून, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
www.konkantoday.com