दापोली-सुकोंडी येथे सिलिंडर स्फोटात खानावळीचे सुमारे 12 लाखांचे नुकसान

दापोली : तालुक्यामधील सुकोंडी आडेफाटा येथे  स्वयंपाक गॅसच्या सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत शैलेश पेटकर यांच्या घराचे व खानावळीचे सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना दि. 19 सप्टेंबर रोजी रात्री 7.15 वा. च्या सुमारास घडली. शैलेश पेटकर यांचे घर सुकोंडी आडेफाटा या ठिकाणी आहे. पर्यटकांची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने घरगुती खानावळ व्यवसाय सुरू केलेला आहे.  19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7:15 सुमारास घरातील सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यावेळी खानावळीमधील व घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत शैलेश पेटकर यांचे 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे 4 फ्रिज, 1 लाख रुपये किमतीचे 2 डीप फ्रीज, 30 हजार रुपये किमतीचा इन्व्हर्टर, 2 लाख रुपये किमतीचे भांडी व तत्सम साहित्य, टेबल फॅन, सिलिंग फॅन  यासह सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान यांचे झाले आहे.  दापोली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे . याची खबर शैलेश पेटकर यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. दापोली तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आलेला आहे. अधिक तपास पोलिस हे. कॉ. चौरे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button