चिपळुणात रामदास कदम यांचा शिवसेनेने केला निषेध
चिपळूण : आदित्य ठाकरे यांच्याबाबत रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा चिपळूण तालुका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन करीत तीव्र शब्दांत निषेध केला. शहरातील चिंचनाका येथील चौकात त्यांच्या पुतळ्यावर जोडे मारो आंदोलन करण्यात आले व निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. दापोलीतील सभेत रामदास कदम यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आणि व्यक्तिगत टीका झाल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. नवनिर्वाचित तालुकाप्रमुख विनोद झगडे, गुहागर विधानसभा क्षेत्र तालुकाप्रमुख संदीप सावंत, महिला संघटक वैशाली शिंदे, पार्थ जागुष्टे, माजी पं. स. सदस्य राकेश शिंदे, भय्या कदम आदींच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संदीप राणे, सचिन शेट्ये, वेदांत शिंदे, मनोज शिंदे, माजी सभापती धनश्री शिंदे, ऐश्वर्या घोसाळकर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.