किरीट सोमय्या गुरुवारी दापोलीत
दापोली : भाजपा नेते किरीट सोमय्या हे गुरुवारी दि. 22 रोजी दापोली दौर्यावर येणार आहेत. तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी दुपारी 12.45 वाजता ते दापोली पोलिस ठाण्याला भेट देणार आहेत.
सोमय्या हे दुपारी 1.45 वाजता दापोली प्रांत कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग दापोली येथील अधिकार्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या दिवाळीपूर्वी साई रिसॉर्ट पडेल, असा दावा सोमय्या यांनी केला असून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी निविदाही बांधकाम विभागाने काढली आहे.
सोमय्या यांच्या मागील दौर्यावेळी मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडणार असल्याचे आश्वासन प्रशासन यांनी दिले होते. त्यानंतर सोमय्या यांनी प्रतिकात्मक हातोडा हा मुरुड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठेवला आहे. सोमय्या यांच्या दापोली दौर्याची माहिती त्यांच्या मुंबई येथील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.