रत्नागिरीत टोळीने बोलण्यात गुंतवून व्यापाऱ्याचे पावणे दोन लाखांचे दागिने लुटले
बोलण्यात गुंतवून ठेवत व रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे नेत नंदकिशोर पाडळकर राहणार खेडशी या टेलर व्यावसायिकाला दोन जणांच्या टोळीने त्यांच्या अंगावरील दागिने काढून एक लाख ब्याण्णव हजार रूपयाचा लुटल्याची घटना घडली आहे
फिर्यादी नंदकिशोर पाडळकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे त्यांचे तेलीआळी येथे टेलरिंगचे दुकान आहे ते काल सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी निघाले होते त्यावेळी त्यांना तेलीनाका येथे दोन जण भेटले त्यांनी त्याना बोलण्यात गुंतवले व आठवडा बाजार या ठिकाणी नेले जास्त दागिने व पैसे जवळ ठेवू नका असे सांगत त्यांनी पाडगावकर यांना बोलण्यात गुंतवले त्यांच्या अंगावरील एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचे दागिने त्यांनी या टोळीकडे काढून दिले दागिने मिळाल्यानंतर हे चोरटे तेथून फरार झाले यानंतर भानावर आलेल्या पाडळकर यांनी आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यावर रात्री उशिरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली
www.konkantoday.com