राजापूरमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात तब्बल 19 किलो वजनाचा भोपळा
राजापूरमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात तब्बल 19 किलो वजनाचा भोपळा पिकला आहे. प्रवीण तोरसकर या शेतकऱ्याच्या शेतात तांबड्या भोपळ्याच्या लागवडीतून हा भोपळा तयार झाला असून एवढा मोठा भोपळा राजापूरमध्ये पहिल्यांदाच उत्पादित झाला आहे.राजापूर दोनीवडे येथील अभ्यासू बागायतदार प्रवीण तोरसकर यांच्या हातीवले येथील आंबा काजू बागायती बरोबरच आंतरपीक घेत काकडी, चिबुड दुधी, तांबडा भोपळा यांची लागवड करून विक्रमी पीक घेतलं आहे. त्यांच्याच या बागायतीत महाकाय असा तब्बल 19 किलो वजनी भोपळा उत्पादित झाला आहे . या उत्पादनासाठी सेंद्रिय खताचा वापर केल्याचे त्यांनी सांगितलं. हवामानातील बदलाचा परिणाम आंबा,काजू या उत्पादनावर होताना दिसून येतोय. फक्त या उत्पादनांवरच अवलंबून न रहाता आंतर पिकातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते हे आज त्यांनी दाखवून दिले आहे.
www.konkantoday.com