
रत्नागिरी-साळवी स्टॉप येथे उघड्यावर बियर पिणाऱ्या दोघांवर गुन्हा
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉपजवळील उघड्या जागेत बियर पिण्यासाठी बसलेल्या दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद मारुती भिंगारे (वय 29, रा. विश्वनगर, रत्नागिरी) आणि अक्षय रमेश तेंडुलकर (वय 29, रा. देवतळे पाली, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. ही कारवाई रविवार 18 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वा. करण्यात आली.
हे दोघेही साळवीस्टॉप जवळील उघड्या जागेत बियर पिण्यासाठी बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली. याचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.