
मित्राला विचारणा केल्याच्या रागातून तीनवड येथे पत्नीवर चाकूहल्ला
चिपळूण : तीनवड येथे पतीने किरकोळ कारणावरून पत्नीवर चाकूने हल्ला करीत तिला जखमी केले आहे. ही घटना दि. 15 रोजी सायंकाळी 5 वा. घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद सायली शैलेश चव्हाण (वय 32) यांनी दिली आहे. सायली व पती शैलेश हे दाम्पत्य तीनवड येथे भाड्याने राहतात. दि. 15 रोजी सायली यांनी शैलेश याचा मित्र गणेश देवरूखकर याला ‘तू काल घरी कशाला आला होतास?’ असे विचारले. याचा राग मनात धरून पती शैलेश याने सायलीवर चाकू हल्ला केला. यामध्ये हाताच्या दंडावर व डाव्या हाताच्या अंगठ्याला तसेच हनुवटीवर दुखापत झाली आहे. तसेच पत्नी सायली हिला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शैलेश सुरेश चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.