
मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस 20 पासून धावणार विजेवर
मांडवी तसेच कोकणकन्या एक्स्प्रेस या गाड्या दि. 20 पासून विद्युत इंजिनसह धावणार आहे. दि. 20 पासून विजेवर सुरु होणार्या आणि त्यापाठोपाठ विजेवर धावण्यासाठी निवडलेल्या मिळून एकूण 18 गाड्या येत्या काही दिवसात विद्युत इंजिनसह धावणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गे मुंबई सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस (10103/10104) तसेच कोकणकन्या एक्स्प्रेस (10103/10104) या कोकणवासीयांच्या पसंतीच्या गाड्या दि. 20 सप्टेंबरपासून विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत. त्यासापाठोपाठ पुढील काही दिवसात एकूण 18 गाड्या या विद्युत इंजिनसह संपूर्ण विद्युतीकरण जालेल्या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.