
मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सव काळात ५ दिवस अवजड वाहनांना बंदी
गणपती उत्सवानिमित्त कोकणात रस्तेमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत. तसेच गणेशोत्सव काळात ५ दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे .
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. तसेच निर्बंधही शिथिल झाले आहेत. त्यामुळे कोकणात एस.टी, खासगी बस आणि चार चाकी वाहनाने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई ते गोवा महामार्गावर ८ ते १० सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबरला अवजड वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली
www.konkantoday.com