परबांचे मुरुड येथील रिसॉर्ट पाडण्यासाठी मी टेंडर भरेन : माजी आ. अशोक पाटील
दापोली : अनिल परब यांनी मुरुड येथे बांधलेले साई रिसॉर्ट पाडण्यासाठी कोणी टेंडर भरलं नाही तर मी त्यासाठी टेंडर भरेन, असे भांडूपचे माजी आमदार अशोक पाटील यांनी दापोली येथे बोलताना सांगितले. दापोलीत शिवसेना शिंदे गट यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या
वेळी पाटील यांनी भास्कर जाधव यांच्यावरही देखील टीका केली.