चिपळूण-पाग येथील तरुणाचा शॉक लागून मृत्यू
चिपळूण : शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी येथील एका 29 वर्षीय तरूणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. प्रमोद परशुराम शिंदे असे त्याचे नाव आहे. रविकांत शंकर गायकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.