चिपळुणातील सांस्कृतिक केंद्राचा पडदा उघडण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले

चिपळूण : चिपळुणातील सांस्कृतिक केंद्राचा पडदा उघडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडे हा निर्णय देण्यात आला आहे. शनिवारी (दि.17) सायंकाळी उशिराने आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सर्वपक्षीय बैठकीत प्रशासनाने हा निर्णय झाला. याची अंमलबजावणी करीत सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यासाठी नियोजन करावे, अशा प्रकारच्या निर्णयावर एकमत झाले.
यावेळी आ. शेखर निकम म्हणाले, कोट्यवधी रूपये खर्च करून सांस्कृतिक केंद्र बंद आहे, हे योग्य नाही. सर्वपक्षीयांच्या सहकार्याने सांस्कृतिक केंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. याला सर्वांनी सहमती दर्शवली. त्यानुसार केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीने मार्ग काढावा. असे सांगून बहुतांश उपस्थितांनी ही जबाबदारी प्रशासनावर सोपवली. शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात आ. निकम यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली चिपळूणचे सांकृतिक केंद्र पुन्हा सुरू करण्याबाबत सर्वपक्षीय प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला माजी आ. रमेश कदम, माजी नगराध्यक्ष सूचय रेडिज, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, माजी सभापती शौकत मुकादम, सेना शहरप्रमुख उमश सकपाळ, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, भाजप शहर अध्यक्ष आशिष खातू, माजी स्वीकृत नगरसेवक विजय चितळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहर अध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक शिरीष काटकर, इनायत मुकादम, अविनाश केळसकर, श्रीराम खरे, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, माजी पं. स. सदस्य नितीन ठसाळे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, अनंत मोरे आदींच्या उपस्थितीत केंद्र सुरू करण्याबाबत विविध मुद्यांवर प्रदीर्घ चर्चा केली.
दरम्यान, माजी नगरसेवक शिरीष काटकर, इनायत मुकादम, अविनाश केळसकर, शशिकांत मोदी आदींनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. त्याचबरोबर सांस्कृतिक केंद्रातील कामात झालेल्या गैरव्यवहाराचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले जाईल. मात्र, तांत्रिक तक्रारी असलेल्या अडचणीच्या मुद्यातून मार्ग कसा काढणार? असा सवालही चर्चेदरम्यान निर्माण झाला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button