
चिपळूण शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा पहिला बळी
कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी चिपळूण शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती.या निर्माण झालेल्या पूरस्थितीने एक बळी देखील घेतला.शहरातील भोगावे येथील मोठ्या मोरी मध्ये वडनाका येथील मोहन पालकर(५०) यांचा मृतदेह काल सकाळी सापडला.
पालकर हे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चि’च नाका येथे काहींना दिसून आले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते.अशातच मंगळवारी सकाळी भोगाव येथील तुंबलेल्या मोरीची साफसफाई करताना पालकर यांचा मृतदेह आढळून आला.
www.konkantoday.com




