
चिपळूण महापुराच्या अभ्यासगटाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी
चिपळूण : दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली चिपळुणातील अभ्यास गटामधील सर्व सदस्यांची सीआयडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिपळुणातील महापुराला कोळकेवाडी धरणातील विसर्ग कारणीभूत नसल्याचा अभ्यास गटाचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर भोजने यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत भोजने यांनी दिलेल्या निवेदनानुसार, 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुरानंतर अनेक कोळकेवाडी धरण व्यवस्थापबाबत संताप व्यक्त केला. चिपळूण शहर धरणक्षेत्रातील पाण्याने बाधित असल्याचे दाखवून सरकारकडून 90 टक्के शहराला विकासापासून वंचित ठेवले. काही दिवसांपासून या शहराचा विकास फक्त महाविकास आघाडीच करू शकते, असे चित्र निर्माण करण्यात आले. काही दिवसांतच दीपक मोडक यांची महापुराची कारणे शोधण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. या समितीत मूळ सर्व विषयांची माहिती उपलब्ध असणार्या नागरिकांना जाणून बुजून डावलण्यात आले. या अभ्यासातून काहीच निष्पन्न झाले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया भोजने यांनी दिली आहे.