
पक्षप्रमुखांना रिफायनरीबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत चुकीची माहिती देत असल्याचा आरोप
शिवसेना खासदार विनायक राऊत अडचणीत सापडले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी खोटे बोलून चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ही बाब धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाशी संबंधित आहे.
सुमारे 90 टक्के स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर 10 टक्के लोक या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. मात्र, या प्रकल्पाला 90 टक्के स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याचे विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना या प्रकल्पाबाबत सांगितले. याबाबत आता स्थानिकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. अशी तक्रार शिवसेनेचे राजापूरचे उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांनी केली आहे. तक्रारीवर ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्याही आहेत. कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून उद्धव ठाकरे आपल्या खासदाराविरोधात काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.con