पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जीवन कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी – ॲड. दीपक पटवर्धन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ हा “सेवा पंधरवडा” भा.ज.पा रत्नागिरीचे माध्यमातून राबवला जाणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला मोदिजींच्या जीवनपटावर आधारित चित्र प्रदर्शनाचे व ब्लड कॅम्पचा प्रारंभ आ.संजय केळकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाच्या हॉलमध्ये मोदीजींच्या जीवन कार्यातील महत्त्वाचे टप्पे चित्र माध्यमातून प्रदर्शित केले आहेत. प्रदर्शनात मोदीजींचे दोन कटआउट लावण्यात आले असून तेथे सेल्फी पॉईंट करण्यात आला आहे. मोदीजींच्या युवा अवस्थेपासून आजतगायत विविध फोटो व माहिती चित्र प्रदर्शनाचे माध्यमातून समोर आणण्यात आले आहेत. रत्नागिरीतील नागरिकांसाठी हे प्रदर्शन सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० ते दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० या वेळात सोमवार व मंगळवार रोजी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना आ.संजय केळकर यांनी मोदीजींचा वाढदिवस संपूर्ण देशभरातले नागरिक सेवा कार्यातून साजरा करत आहेत असे सांगितले. अंत्योदयाचे सूत्र धरून चाललेली काम, ब्रिटनला मागे टाकून ५ व्या क्रमांकावर पोचलेले आपले दरडोई उत्पन्न, ३७० कलम रद्द करून काश्मीरचा स्वतंत्र दर्जा हटवणे, राम मंदिर निर्माणाचे सुरू असलेले काम या सर्वांमुळे मोदीजींची एक स्वतंत्र प्रतिमा निर्माण झाली आहे असे सांगितले. मोदीजींना शुभेच्छा देण्यासाठी सेवा कार्यात सामील व्हा असे आवाहन आ.संजय केळकर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी व उद्बोधक आहे. भा.ज.पा कार्यकर्त्यांनी आजच्या दिवशी मोदीजींच्या कर्तव्यपथावरून जाण्याचा संकल्प करावा व मोदीजींना शुभेच्छा द्याव्यात असे भावोद्गार जिल्हा अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी याप्रसंगी काढले. या प्रदर्शनीच्या शुभारंभ प्रसंगी ॲड.बाबा परुळेकर, श्री.विक्रांत जैन, श्री.सचिन करमरकर, श्री. सचिन वहाळकर, श्री. बाबू सुर्वे, श्री. राजू तोडणकर, सौ.सोनाली आंबेरकर, श्री.दादा ढेकणे, श्री. नितीन जाधव, श्री.प्रमोद खेडेकर आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button