तांबी नदीत मासे पकडताना गोंधळे येथील तरुणाचा बुडून मृत्यू
चिपळूण : तांबी नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तोल जाऊन नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. चिवेली करंबेली येथे ही घटना घडली. प्रवीण राजाराम बारे (वय 28, रा. गोंधळे सतीचीवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत पंकज कुळ्ये (रा. गोंधळे) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, दि. 14 सप्टेंबर रोजी प्रवीण बारे हा मासे पकडण्यासाठी तांबी नदीमध्ये गळ टाकून मासे पकडत होता. अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व त्याचा बुडून मृत्यू झाला.