
सदानंद चव्हाण यांचा शिवसेनेचा ठेका संपला असावा : जिल्हाप्रमुख सचिन कदम यांची टीका
चिपळूण : शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामुळे सदानंद चव्हाण दोनवेळा आमदार झाले. आता तिसर्यावेळी आपले अस्तित्त्व धोक्यात आहे, हे त्यांना लक्षात आले आहे. चव्हाण हे ठेकेदार असल्यामुळे त्यांना फक्त ठेकेच दिसतात. त्यांच्या दृष्टीने शिवसेनेचा ठेका संपल्याने आता ते नवीन ठेका शोधत असतील, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी माजी आ. सदानंद चव्हाण यांच्यावर केली. चिपळुणातील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही टीका करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे बाळा कदम, राजू देवळेकर, विनोद झगडे, धनश्री शिंदे, शशिकांत मोदी, श्री. राणे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख कदम म्हणाले, चव्हाण आता स्वत:च्या फायद्यासाठी शिंदे गटात जात आहेत. ते गेल्याने शिवसेना संघटनेवर परिणाम होणार नाही. जे त्यांच्याबरोबर गेले ते अर्ध्यातूनच परत आले, असेही कदम म्हणाले.