
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटामध्ये दरडी कोसळल्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटामध्ये रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास मुख्य धबधबा पासून अर्धा किलोमीटर पुढे दरड कोसळली. त्यामुळे घाट रस्ता पूर्णपणे वाहतुकीस ठप्प झाला. याबाबत आंबोली पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर आंबोली पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी जात पाहणी केली. तत्काळ वाहतूक थांबवली यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास आंबोली पूर्वीचा वस येथेसुद्धा भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे आंबोली घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीस पूर्णपणे ठप्प झाला
www.konkantoday.com