
भैरागड – भोपाळ येथे अग्निवीर सैन्य भरती
रत्नागिरी : ई.एम.ई. सेंटर भैरागड भोपाळ, येथे 19 सप्टेंबरपासून हेडक्वॉर्टरस युनिट कोटामधून अग्निवीर सैन्य भरती आयोजित करण्यात आली
आहे. या भरतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भरतीमध्ये युद्ध विधवा, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांच्या पाल्यांकरीता तसेच सेवारत सैनिक यांच्या पाल्यांकरीता सैन्य भरती आयोजित करण्यात आलेली आहे. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 4.00 वाजता अग्निवीर जी. डी., 22 सप्टेंबर रोजी सकाळी 4.00 वाजता अग्निवीर टेक्नीकल, 24 सप्टेंबर रोजी सकाळी 4.00 वाजता अग्निवीर ट्रेडसमनसाठी भरती होणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, विधवा यांचे पाल्यांनी तसेच सेवारत सैनिकांच्या पाल्यांनी भरतीकरीता आवश्यक कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.