जिल्ह्यातील प्रथमच सायबर गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यास गुहागर पोलिसांना यश
जिल्ह्यात अनेक सायबर गुन्हे गेल्या काही वर्षांत घडले असून त्यातिल आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले नव्हते मात्र गुहागर पोलिसांनी सायबर गुन्ह्यात प्रथमच आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे या गुन्ह्यातील आरोपीला राजस्थानमध्ये जाऊन पोलिसांनी अटक केली आहे
गुहागर तालुक्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेला फेब्रुवारी महिन्यात आपल्या आयसीआय क्रेडिट कार्ड सिक्युरीटी प्लॅन क्रियाशील झाला असून तो चालू करण्यासाठी दोन हजार चारशे रुपये भरावे लागतिल आपल्या प्लॅन रद्द करायचा असेल तर सोळा अंकी क्रमांक द्या असे सांगून महिलेचा क्रेडिट कार्ड क्रमांक घेऊन व त्यानंतर आलेला ओटीपी घेऊन त्या महिलेच्या खात्यातून ऐंशी हजार रु दिल्लीतील दुसऱ्या बँकांच्या खात्यात ट्रान्सफर केले सदर महिलेने याबाबत फसवणुकीची तक्रार व अगर पोलिसांकडे केली होती त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांच्या देखरेखीखाली तपासासाठी एक खास पथक करण्यात आले गुन्ह्यातील पैसे दिल्लीतील एका बँक खात्यात जमा झाल्याचे लक्षात आल्यावर एक लाभार्थी बँक खाते हे विशाल सिंग राजेंद्रसिंह शेखावत राणा राजस्थान यांचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले विशालसिंगने दिल्लीतून या खात्यातून व्यवहार केले होते गुहागर पोलिसांच्या या पथकाने राजस्थान गाठून पाळत ठेवून विशाल सिंगला अटक केली गुहागर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे
www.konkantoday.com