आडवली येथे रेल्वे ट्रॅकवर चालत्या मालगाडीखाली आत्महत्या

लांजा : चालत्या मालगाडीखाली झोकून देत 56 वर्षीय पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील आडवली रेल्वेस्टेशन येथे गुरुवारी 15 सप्टेंबर दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची खबर आडवली रेल्वे स्टेशन मास्तर प्रशांत शिंदे यांनी लांजा पोलिसांना दिली आहे. गुरुवारी आडवली रेल्वेस्टेशन येथे ही व्यक्ती उभी होती. दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान दिवा पॅसेंजरला क्रॉसिंग होण्यासाठी मालगाडी आडवली रेल्वेस्टेशन या ठिकाणी थांबवण्यात आली होती. दिवा पॅसेंजर मार्गस्थ झाल्यानंतर मालगाडी ही मार्गस्थ होत असतानाच या ठिकाणी प्लॅटफॉर्म जवळ उभ्या असलेल्या या 56 वर्षीय व्यक्तीने धावत जाऊन मालगाडी खाली स्वतःला झोकून दिले. या घटनेत या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची ओळख पटलेली नव्हती. सदर व्यक्ती हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील रहिवासी असल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button