
युवानेते आदित्य ठाकरेंच्या दौर्याच्या वेळी शिंदे गट प्रवेशाचा धमाका करणार?
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत हाच मुहूर्त साधून शिंदे गटाने अनेक शिवसैनिकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम साधण्याचे ठरवल्याचे वृत्त आहे या प्रवेशाच्या कार्यक्रमात अनेकांची नावे चर्चेत असली तरी दबाव येऊ नये म्हणून ती नावे सध्या गुपीत ठेवण्यात आली आहेत या कार्यक्रमाबाबत शिंदे गटाकडून गुप्तता पाळण्यात आली आहे मात्र शिवसेनेच्या नेत्यांकडून शिवसेनेचा एकही निष्ठावंत कार्यकर्ता शिंदे गटात जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे
www.konkantoday.com