
मंत्री उदय सामंत यांना धमकी ,सहा जणांवर गुन्हा दाखल
राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे आमदार आमदार उदय सामंत यांना जाहीर सभेत शिवी हासडून जाळून ठार मारण्याची उघड धमकी देणार्या मुंबई स्थित नरेंद्र जोशी याच्यासह
अन्य पाच जणांविरूध्द राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी जोशी यांच्यासह सत्यजीत चव्हाण, नितीन जठार, अमोल बाेळे ,सतीश बाणे ,दीपक जोशी याच्या विरूध्द विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे
याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक सौरभ खडपे यांनी राजापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती
गुन्हा दाखल झालेले वरील ग्रामस्थ रिफायनरीविरोधी असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात गोविळ येथे यातील नरेंद्र जोशी यानी भरसभेतच मंत्री सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती इतर आरोपींनी त्याना चिथावणी दिली असा त्यांच्यावर आरोप आहे
www.konkantoday.com