
शिरगाव येथे महिलेसह पती व मुलाला मारहाण
रत्नागिरी ः शिरगाव येथे महिलेच्या पतीला व मुलाला गैरसमजातून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिया साखरकर, मुस्कान साखरकर, बासिद साखरकर, मेहताब साखरकर (सर्व रा. मुस्लिमवाडी शिरगाव, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवार 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 ते 8 वा. कालावधीत घडली आहे. शिरीन नाखवा (वय 40, मुस्लिमवाडी, शिरगाव) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीन नाखवा यांनी आपल्या मुलीला क्लाससाठी समोर असणार्या घरामध्ये पाठवले होते. आपली मुलगी क्लासमध्ये मस्ती करत आहे का? हे पाहण्यासाठी त्या निहा हुश्ये यांच्या घरी गेल्या. शिरीन नाखवा आणि त्यांची मुलगी या घरासमोर राहणार्या समिया साखरकर यांच्या घराकडे बघत असल्याचा गैरसमज झाल्याने मुस्कान, बासिद, मेहताब, समीया यांनी शिरीन हिचा पती एजाज व त्यांचा मुलगा अर्सलान यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच शिरीन यांचे केस धरून डोके भिंतीवर आपटले, यामुळे ती जखमी झाली. याचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.