रिफायनरी संदर्भात आढावा घेण्यासाठी आलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अवघ्या काहीच तासात बदलली भूमिका
नाणार रिफायनरी होणार आहे असे आपण म्हटले होते. मात्र ते कोणत्या आधारावर होणार हे मी बोललो नव्हतो. आमचा सर्वनाश होवून जर नाणार होणार असेल तर त्याला आमचे नेते राहुल गांधी यांनी देखील विरोध केलेला आहे. त्यामुळे ही भूमिका तपासून त्याच्यावरील प्रतिक्रिया निश्चितपणे आपण देवू. आमच्या लोकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचे काम राज्याचा कॉंग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून मी घेईन, अशी बदललेली भूमिका रिफायनरी समर्थकांच्या भेटीत कॉंग्रेस पक्ष तसेच विकासाचे गुणगान गायल्यानंतर अवघ्या तासाभरातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गोवळ येथे झालेल्या रिफायनरी प्रकल्पविरोधकांसमोर मांडली. बारसू-धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाची वस्तुस्थिती तसेच आपले दुःख समजण्यासाठी मी येथे आलो आहे. विकासाचा कॉंग्रेस पक्षाला विरोध नाही, पण ज्या ठिकाणी निसर्ग, मानवी जीवन आणि जलाचरांना धोका निर्माण होणार असेल तर अशा प्रकल्पाला कॉंग्रेस पक्षाचा विरोध राहिल. www.konkantoday.com