
गेल्या २४ तासांत राज्यात ५९ हजार ९०७ नव्या करोनाबाधितांची नोंद
एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये लसीकरणावरून राजकीय वाद सुरू झालेला असताना राज्यातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल ३२२ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५६ हजार ६५२ वर गेला आहे. त्यासोबतच वाढते करोनाबाधित ही देखील आरोग्य व्यवस्थेसाठी चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५९ हजार ९०७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये राज्यात काल ३० हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ही दिलासादायक बाब ठरली आहे!
www.konkantoday.com