
प्रेमसंबंधातून तरुणीच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या राजापूर तालुक्यातील ओणी येथील तरूणाला अटक
प्रेमसंबंधातून तरुणीच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या राजापूर तालुक्यातील ओणी येथील शैलेश मनोहर गोरूले (वय ३०, रा. ओणी, गोरूलेवाडी) याला राजापूर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत २० वर्षीय पीडित तरुणीने राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पीडित तरुणी आणि शैलेश गोरूले यांच्यामध्ये नातेसंबंध आहेत. या दोघांमध्ये पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, शैलेश नात्यातील असल्याने पीडित तरुणी त्याला टाळत होती. त्यामुळे पीडित तरुणीने शैलेश याच्याशी बोलणे बंद केले होते. अशातच महिन्याभरापूर्वी पीडित तरुणी घराजवळील झाडावरील आंबे पाहण्यासाठी गेली हाेती. त्यावेळी शैलेशने तिच्यावर बळजबरी केल्याचे तरुणी फिर्यादीत म्हटले आहे
www.konkantoday.com
