दापोलीत एसटीच्या बससमोर महिला आडवी अन्…

 दापोली :  अचानक महिला एसटीसमोर आडवी आली. तिला वाचवण्याकरिता गाडीचे ब्रेक दाबले असता पाऊस असल्यामुळे गाडी रस्त्यावरून घसरून रस्त्याच्या बाजूला असणार्‍या आंब्याच्या झाडावर आदळली. यामुळे एसटीच्या बसचे समोरील बोनेट दबले गेले. तालुक्यातील खोंडा येथे हा अपघात झाला. अपघातामध्ये बोरिवली-दापोली बसचेे किरकोळ नुकसान झाले आहे. ही घटना 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:30 वा. च्या सुमारास घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक परशुराम चिबडे हे आपल्या ताब्यातील बोरिवली दापोली ही बस सकाळी 6:30 वाजता घेऊन दापोलीला येत होते. दापोलीमधील खेर्डी फाटा सोडून पुढे पांढरेवाडी येथे आले असता अचानक महिला गाडी समोर आडवी आली. या अपघातात गाडीची काच फुटून गाडीचे नुकसान झाले. या अपघाताच्यावेळी गाडीमध्ये ईश्वर खंडागळे हे वाहक आणि दोन प्रवासी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button