
माडांवर कोंब कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव.
रत्नागिरीसह कोकणात यंदा मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जून ते सप्टेंबरपर्यंत या चार महिन्यांची सरासरी ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यात ओलांडली होती. सर्वाधिक १२६ टक्के पावसाची नोंद रत्नागिरी तालुक्यातच झाली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या या अति मुसळधार पावसाचा परिणाम नारळ पिकावर झाला आहे. जोरदार पावसासोबत सोसाट्याचा वारा आणि अधूनमधून उघडीप अशा वातावरणामुळे वाढलेली आर्द्रता आणि कमी झालेले तापमान यामुळे माडांवर सुई किंवा कोंब कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. www.konkantoday.com