रिफायनरी विरोधक जोशी नामक नेत्याची नाना पटोले व पोलिसांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काल झालेल्या राजापूर दौऱ्याच्या वेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. रिफायनरी विरोधक जोशी नामक नेत्याने नाना पटोले व पोलिसांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
या जोशी नामक नेत्याचा व्हिडओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत असून पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणात कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी देखील लक्ष घातले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ना. सामंत यांच्यासोबत चर्चा केली असून आता याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.
www.konkantoday.com