“ना. उदय सामंत यांचे हातपाय तोडू, जाळून ठार मारू” असे वक्तव्य करणार्‍या नरेंद्र जोशीला अटक करण्यासाठी पोलिसांना निवेदन

राजापूर : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी तिघांविरोधात राजापूरचे माजी नगरसेवक सौरभ खडपे यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत रविवारी गोवळ येथे झालेल्या रिफायनरी प्रकल्पविरोधी सभेत हे प्रक्षोभक भाषण करण्यात आले. या सभेत भाषण करताना ना. सामंत यांचे हातपाय तोडू, जाळून ठार मारू, असे वक्तव्य नरेंंंद्र उर्फ अपन जोशी  (मूळ रा. गोवळ, सध्या रा. मुंबई घाटकोपर) याने केले असून त्याला प्रकल्प विरोधी ‘एनजीओ’ म्हणून काम करणार्‍या सत्यजित चव्हाण व नितीन जठार यांनी प्रोत्साहन दिल्याचे खडपे यांनी या तक्रारीत  म्हटले आहे. चव्हाण व जठार यांनी यापूर्वीही अशाप्रकारे प्रकल्पाविरोधात भडकावू वक्तव्य करणार्‍यांना पाठबळ दिलेले असून पडद्यामागून ही मंडळी अशा प्रकारची भडकावू वक्तव्य करण्यास भाग पाडत आहेत,  असेही खडपे यांनी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात जमावबंदी असतानाही विशेष बाब म्हणून नियम व अटींना धरून या सभेला परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे.  मात्र, या सभेत जोशी याने दिलेली धमकी ही गंभीर बाब आहे. एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षासमोर अशाप्रकारचे वक्तव्य करून उपस्थितांना भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो व्हीडीओ देखील आम्ही या तक्रारीसोबत आपणाकडे देत आहोत. याची तत्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करून त्यांना अटक असे खडपे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button