कोकणातील ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ उलगडणार मालिकेतून

रत्नागिरी : शिक्षणासाठीची जिद्द, आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर मंगळवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोकणातली नयनरम्य दृश्य, हिरवीगार वनराई, नीळाशार समुद्र अशा स्वर्गसुखाच्या सान्निध्यात ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे.  या मालिकेचं चित्रीकरण कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड  याठिकाणी सुरू आहे. गावात राहणारी ही छोटी बयो तिच्या डॉक्टर होण्याच्या मोठ्या स्वप्नाला कसा आकार देणार हे या मालिकेतून पहायला मिळणार आहे. या मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकर ही  साकारणार असून ती मूळची कोकणातली आहे. यात  विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर, शरद सावंत हे अन्य कलाकारही या  मालिकेत पाहायला मिळणार आहेत. विशेषत: अभिनेत्री वीणा जामकर पहिल्यांदाच मालिका विश्वात पाहायला मिळणार आहे.  त्यामुळे तिच्या अभिनयाची जादू छोट्या पडद्यावर म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवर पाहणं विशेष ठरेल. तर मालिकेतले काही निवडक कलाकारही कोकणातले आहेत. ‘इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकाची ओढ’ असं म्हणत पुस्तकात सतत डोकं घालून असणार्‍या बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास कसा पूर्ण होईल हे पहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका 12 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8. 30 वा. पाहता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button