
माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची हत्या? पतीसह तीनजणांना अटक व पोलिस कोठडी
माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची हत्या झाली असल्याची व ही हत्या तिचे पती सुकांत सावंत यांनी केली असल्याची तक्रार स्वप्नाली सावंत यांच्या आई सौ. संगिता कृष्णा शिर्के यानी रत्नागिरी पोलीस स्थानकात केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी क्र.(१) सुकांत उर्फ भाई गजानन सावंत, वय ४७ वर्षे, रा. सडामिन्या व मिर्या बंदर , ता. व जि.रत्नागिरी क्र. (२) रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत, वय ४३ वर्षे, रा. मिर्या बंदर व जि.रत्नागिरी, व क्र. (३) प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग, वय ३३ वर्षे, रा. मिर्या बंदर, ता. व जि.रत्नागिरी, यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत दि०१/०९/२०२२ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता सौ. स्वप्नाली सुकांत सावंत, वय ३५ वर्षे,रा. मिर्याबंदर, ता. व जि. रत्नागिरी मिर्याबंदर येथील घरातून निघून गेली व परत आली नसल्याबाबत तिचे पती सुकांत गजानन सावंत, वय ४२ वर्षे यांनी दि. ०२/०९/२०२२ रोजी रत्नागिरी शहर पोलीस
ठाणे येथे दिली हाेती या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे हरविलेल्या व्यक्तींची नोंद दाखल करण्यात आलेली होती.पोलीस स्वप्नाली सावंत ही हरविल्याच्या तसेच तिचा घातपातच्या झाल्याच्या दृष्टीने तपास करीत असताना, दि. ११/०९/२०२२ रोजी स्वप्नाली सुकांत सावंत यांची आई सौ. संगिता कृष्णा शिर्के,वय ६४ वर्षे, रा. तरवळ, पो. जाकादेवी, ता. व जि. रत्नागिरी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथेयेऊन, तक्रार दिली की, स्वप्नाली सावंत हीचा दि. ०१/०९/२०२२ पासून संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिच्याबाबत माहिती घेण्यासाठी दि१०/०९/२०२२ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता सौ. संगिता कृष्णा शिर्के व तिच्या अन्य मुलींनी मिन्या बंदर येथील स्वप्नाली सावंत हीच्या घरी भेट दिली. त्यावेळी तेथे सुकांत सावंत हा होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या वादामध्ये सुकांत सावंत यांने त्यांना सांगितले की, त्याने स्वप्नालीला ठार मारले आहे. यावर सौ. संगिता कृष्णा शिर्के यांनी रत्नागिरी शहर पोलीस
ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून दि. ११/०९/२०२२ रोजी ०३.४९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलाअसून, सदर गुन्ह्याचा तपास गा. पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग व मा. अपर पोलीस अधिक्षक
जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी
उपविभाग हे करीत आहेत.
सदर गुन्ह्याच्या वेगवान तपासाकरीता मा. पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्याआदेशान्वये सदर गुन्ह्याच्या तपासकामी अनुभवी व निवडक पोलीस अधिकारी व अंमलादारांची तपासपथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच पोलीसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दाखल गुन्ह्यात आरोपी क्र.(१) सुकांत उर्फ भाई गजानन सावंत, वय ४७ वर्षे, रा. सडामिन्या व मिन्या बंदर, ता. व जि.रत्नागिरी क्र. (२) रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत, वय ४३ वर्षे, रा. मियाबंदर, ता. व जि.
रत्नागिरी, व क्र. (३) प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग, वय ३३ वर्षे, रा. मिया बंदर, ता. व जि.
रत्नागिरी, यांना दि. ११/०९/२०२२ रोजी अटक केली असून, त्यांना मा. न्यायालयासमोर हजर केले
असता, त्यांना दि. १९/०९/२०२२ रोजी पर्यंत तपासकामी पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
www.konkantoday.com