
रत्नागिरी शहरातील नव्या नळपाणी योजनेच्या कामाच्या दर्जा बोंबलला, फुटत आहेत रस्त्यावरच कारंजे
रत्नागिरी शहरातील करोडो रुपये खर्चून नव्या नळपाणी योजनेचा मोठा गाजावाजा केला गेला रत्नागिरीकरांना मुबलक पाणी मिळणार म्हणून नळपाणी योजनेच्या चऱासाठी खोदलेल्या रस्त्याची दुर्दशा रत्नागिरी करानी गेल्या एक दीड वर्षे सहन केली नळपाणी योजना राबविताना कोणत्याही नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी भररस्त्यात ही नळपाणी योजनेची पाइपलाइन घालण्यात आली या योजनेचे पूर्णकाम अद्याप संपलेले नाही मात्र मुख्य रस्त्यावरून ही पाईपलाईन घालण्याचे काम पूर्ण झाले आहे मात्र देण्याघेण्यात थकलेला कंत्राटदाराने कसेबसे हे काम पूर्ण केले असले तरी त्याला कोणत्याही दर्जा राहिलेला नाही त्यामुळे नळपाणी योजनेचे मुख्य रस्त्यावरील काम पूर्ण झाल्यानंतर डांबरीकरण करण्यात आले परंतु अनेक ठिकाणी चराच्या ठिकाणी माती दबली गेल्याने मोठमोठे खड्डे पडले तर अनेक ठिकाणी शहराच्या रस्त्यावरच पावसाळ्यात ओहोळ निर्माण झाले रत्नागिरी शहरातील नंळ योजनेचे काम नव्वद टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे मात्र अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर सतत पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडत आहेत रत्नागिरी येथील जयस्तंभ येथील सर्कलच्या ठिकाणी तीन ते चारवेळा पाइपलाइनचे जॉइंट्स सुटल्याने वारंवार दुरुस्ती करण्यात येत आहे विशेष म्हणजे हे काम कंत्राटदार न करता आता रत्नागिरी नगरपरिषदेचे कामगार करीत आहेत असे असूनही अनेक ठिकाणी मधून मधून पाइप फुटण्याचे प्रकार घडतच आहेत रत्नागिरी शहरातील राम मंदिराच्या बाजूला असलेल्या ठिकाणी काल राम नाका परिसरात रत्नागिरी नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेचे पाइप फुटून पाणी वाहू लागले तर अनेक ठिकाणी डांबरी रस्त्यातून छोट्या कारंज्यानी डोकी वर काढली त्यामुळे पाऊस नसतानादेखील तो भाग पाणीमय झाला पाईपलाईन फुटल्यामुळे अनेकांना त्या भागातील अनेकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले त्यामुळे या योजनेच्या कामाबाबत व त्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईप व साहित्याच्या दर्जाबाबत आता शंका उपस्थित होत आहे यावेळी योजनेचे श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे येत असलेले त्यावेळचे नगरपरिषदेमधील सत्ताधारी आता मूग गिळून आहेत शहरवासीयांना मुबलक पाणी मिळावे या हेतूने शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी खर्चूनही असे प्रकार घडत राहिल्यास रत्नागिरीकरांना खरोखर या योजनेचा दीर्घकाळ फायदा होणार की कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे
www.konkantoday.com
