नोकरी मिळत नसल्याने भोस्ते विराचीवाडी येथील तरुणाची आत्महत्या

खेड : तालुक्यातील भोस्ते विराचीवाडी येथील तरुणाने बेरोजगारीला कंटाळून दि. ८ रोजी आत्महत्या केली. सदर तरुणाने सकाळी ८ ते १२ या कालावधीत घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली असावी असे सूत्रांकडून समजते.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार अजय भंडारे (वय २७) हा तरुण त्याच्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत मृत आढळून आला. ओंकार याचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले होते. परंतु त्याला नोकरीत यश येत नव्हते. त्यामुळे त्याने नैराश्य येऊन गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button