
मौजे गुणदे गणवाल पुनर्वसन वसाहतीत तरुणाचा गळफास
खेड : तालुक्यातील मौजे गुणदे गणवाल पुनर्वसन वसाहतीत तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे. कृष्णा भिकाजी नायनाक (वय-५५ रा. गुणदे) यांनी खेड पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विशाल कृष्णा नायनाक (वय-२३ वर्षे रा. गुणदे ) याचा मृतदेह दि. ७ रोजी सकाळी त्याच्या मौजे गुणदे गणवाल पुनर्वसन येथील राहत्या घरी आढळून आला. तो दारुचा अतीव्यसनी होता. तसेच त्याच्या मेंदूला सुमारे एक वर्षापूर्वी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. त्याच्यावर औषधोपचार चालू होते. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या संपल्याने बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळे त्याने लाकडी वाश्याला नायलॉनच्या दोरीने गळफास लावला असावा, असे नमूद केले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात दिला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.