
सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीत मतदारांची संख्या सर्वाधिक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात १४ लाख ३८ हजार ४७१ मतदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ७ लाख ८० हजार ६९१, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ५७ हजार ७८० मतदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख २२ हजार ९११ जादा मतदार आहेत. खासदार ठरवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा खर्या अर्थाने किंगमेकर ठरणार आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी तीन अशा एकूण सहा मतदार संघांचा मिळून लोकसभा मतदार संघ तयार करण्यात आला आहे. सिंधुदुर्गच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील मतांची संख्या सुमारे सव्वा लाखाने जादा आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांची खासदार निवडीत महत्वाची भूमिका ठरणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी विनायक राऊत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार विनायक राऊत १७ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल करणार आहेत. दि. २९ मार्चपासून खा. राऊत यांचा गावभेट दौरा सुरू झाला असून तो दि. ११ एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे. शुक्रवारी चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटातील पदाधिकाारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, आजी-माजी आमदार आदींची खा.राऊत यांनी चर्चा केली आहे.www.konkantoday.com