
केबीसीवर २५ लाखांचे बक्षीस लागल्याचे संदेश अजुनही प्रसारित नागरिकांनी सावध राहण्याची गरज
आपणाला आपला मोबाईल नंबर ५ हजार मोबाईलमधून लकी ठरला असून आपल्याला २५ लाखांचे बक्षीस लागले असून त्यासाठी तुम्ही आम्ही सांगत असलेल्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा असे मेसेज अजूनही जिल्ह्यातील अनेक नागरिकांना येत आहेत. बक्षीसाचे आमिष दाखवून यापूर्वीही अनेकांची ऑनलाईनद्वारे लाखो रूपयांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा बनावट मेसेजपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
ग्राहकांना जे मेसेज पाठवण्यात येतात यामध्ये मेसेज करणारा तुम्हाला सांगत आहे की, मी केबीसीमधून राजेश शर्मा बोलत असून आपल्यासाठी चांगली बातमी आहे. आपल्या वॉटसऍपचा नंबर लकी नंबर ठरला असून त्याला २५ लाखांचे बक्षीस लागले आहे. त्यामुळे तुमचे अभिनंदन. तुम्हाला पाच हजार नंबरमधून तुमचा नंबर विजेता ठरला आहे. तुम्हाला २५ लाखांचे बक्षिस मिळविण्यासाठी तुम्ही यासाठी आमच्या मॅनेजरशी संपर्क साधा. व ते सांगतील त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करा असे मेसेज करणारा सांगत आहे.
अनेक लोकांना हे बक्षिसाच्या आशेमुळे खरे वाटते आणि ते समोरील सांगत असलेली व्यक्तीप्रमाणे आपल्या मोबाईलद्वारे अनेक महत्वाची माहिती समोरच्या माणसाला देते. त्यामुळे संबंधिताच्या बँक खात्यातून किंवा अन्य ऑनलाईनद्वारे लाखो रूपये काढून घेतात. यामुळे अनेकांची यापूर्वीही लाखो रूपयांची फसवणूक झाली असून फसवणूक करणारे चोरटे मात्र अद्यापही मिळत नसल्याने ते आपले नवीन सावध शोधत फिरत असतात. त्यामुळे बक्षिसाच्या मोहापाई अशा बनावट मेसेजला बळी पडू नये असे पोलीस खात्याने देखील वारंवार आवाहन केले असून जनतेने सावध राहणे गरजेचे आहे. www.konkantoday.com