विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आतुर झालेला तरूण गुहागरात बुरखा घालून आला आणि लोकांच्या व पोलिसांच्या ताब्यात सापडला
विवाहित प्रेमीकेला भेटण्यासाठी खेर्डी चिपळूणमधील एक तरूण बुरखा घालून गुहागर शुंगारतळी येथे आला मात्र त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे लोकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवल्यावर
त्याल्या स्कूटरवरून पळताना ताब्यात घेण्यात आले पोलिसी हिसका दाखवल्यावर बुरखाधारी तरूणीची नव्हे तर तरूणाची प्रेमकहाणी पुढे आली
चिपळूण खेर्डी येथील राहणारा या तरूणाचा खेर्डी परिसरात सौंदर्यप्रसाधने विकण्याचा व्यवसाय आहे ज्या ठिकाणी करणार्या आठवडाबाजारमध्ये त्याचे दुकान असते व्यवसायाच्या निमित्ताने हा तरुण शुंगारतळीत येत असे तेव्हा त्याचे तेथील एका विवाहितेवर सूत जमले आपल्या प्रेमिकेला भेटण्यास आतूर असलेला हा तरुण चक्क दुपारी बुरखा घालून ऑक्टिव्हा स्कूटरवरून शृंगारतळिला आला मात्र तो बुरखा घालून उभा असता त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने काही लोकांनी ही गोष्ट मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांना कळवली त्यांनी आपले कार्यकर्ते घटनास्थळी पाठवल्यावर हा बुरखाधारी तरुण तेथून अॅक्टिव्हा स्कूटर घेऊन पळू लागला या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आल्यावर पोलिसांनी सदर बुरखाधारी ला अडवल्यावर ही बुरखाधारी तरुणी नसून तरुण असल्याचे आढळून आले दरम्याने त्याला पाेलिस ठाण्यात अाणून हिसका दाखविल्यावर त्याने आपले प्रेमप्रकरण सांगितले याबाबत पोलिसांनी त्यांचे जाबजबाब घेतले असून या प्रकरणाची सध्या या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे
www.konkantoday.com