कडवई सामपंचायतीचा कारभारामुळे गणपती विसर्जनासाठी कडवई घोसाळकर कोड ग्रामस्थांना करावी लागली ओढाताण
संगमेश्वर तालुक्यातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठीत मानली जाणार्या कडवई ग्रुप ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांना निराशाजनक अनुभव येत आहेत यांचाच प्रत्यय परवा दिनांक 5. सब्टेंबर रोजी कडवई घोसाळकर कोड खालची वाडी, मधील ग्रामस्थांना आला मागचे एक ते दिड वर्षे पाठपुरावा करून सुद्धा गणपती विसर्जन घाटामधिल गाळ हा तसाच ठेवण्याचे काम जाणीवपुर्वक रित्या ग्रामपंचायतीने केल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे गणेशोत्सव तोंडावर असताना हर्षद घोसाळकर व चंद्रकांत घोसाळकर यांनी ग्रांपंचायती मध्ये जावून सत्ताधारी लोकप्रतिनिधींना भेटून विसर्जन घाटावरील गाळ साफ करण्याची आणि साफसफाईचे काम करावे हि विनंती केली.
दिड वर्षापासून हे काम का झाले नाही याची विचारणा केली असता संरपंच व उपसरपंच यांनी हे काम आमचे नसल्याचे सांगून . तुमचे साफसफाईचे काम गाळ उपसण्याच काम तुम्हीच करा, असा मोफतचा सल्लाही दिला साफसफाई साठी ग्रास कटर मागितला असता आमचे सर्व ग्रास कटर नादुरुस्त आहेत असा अहवाल देण्यात आला. वास्तविक गावांतील अडचणी व समस्या सोडवण्याचे काम ग्रामपंचायतीचे आहे मात्र ग्रामपंचायतीच्या चुकीच्या धोरणा मुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे या भागातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे कडवई घोसाळकर कोड खालची वाडी विसर्जन घाटाच्या पुढील बाजूस चुकीच्या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला या चुकीच्या धोरणामुळे हा विसर्जन घाट पूर्ण पणे वाळू आणि मातीने भरला गेला होता दिनांक 5 रोजी शेवटी येथील ग्रामस्थ चंद्रकांत घोसाळकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी उपाअध्यक्ष हर्षद घोसाळकर भाजपा कडवई कार्यकर्ते अमेय सुर्वे, विकास घोसाळकर योगेश घोसाळकर महेंद्र घोसाळकर यांच्या सहकार्याने
स्वखर्चाने या घाटाची गाळ सफाई विसर्जन दिवशी सकाळी 11 वाजता चालु केली व 2 वाजेपर्यंत पूर्ण केली. यासाठी विशेष सहकार्य हे jcb मालक खान यांचे लाभले. पावसाळा सुरू असून सुद्धा खान यांनी गणपती विसर्जन सुरळीतपणे होण्यासाठी JCB मशीन पाण्यात उतरवून गाळ साफ करायचे काम पार पडले
या सर्व प्रकारामुळे कडवई ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामपंचायतीने लोकहीताला प्राधान्य न दिल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे
www.konkantoday.com