अभियांत्रिकी अध्यापकांच्या बुधवारी मुलाखती
रत्नागिरी : रत्नागरीतील शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात बुधवारी अभ्यागत अध्यापकांची निवड केली जाणार आहे. तासिका तत्वावर प्रथम व द्वितीय वर्षासाठी असलेल्या विविध विषयांसाठी या निवडी मुलाखतीद्वारे सकाळी 11 वाजता होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी थिबा पॅलेस येथे स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे. बुधवारी होणार्या मुलाखती दिवसभरात पूर्ण झाल्या नाहीत तर उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती दुसर्या दिवशी म्हणजे गुरूवारी घेतल्या जाणार आहेत. अध्यापक पदासाठी येणार्या उमेदवारांनी थिबा पॅलेस येथील शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात समक्ष हजर राहून नोंदणी करणे आवश्यक आहे.